शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी या टिप्स आजमवा

Created By: Atul Kamble

8 feb 2026

रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित ठेवणे खूपच गरजेचे असते. जास्त वा कमी शुगरने शरीरातील एनर्जी, मेंदू आणि अवयवांवर परिणाम होतो. 

चुकीचा आहार, जास्त गोड, शारीरिक व्यायामाचा अभाव, तणाव, अपुरी झोप, अनुवंशिकता यामुळे शुगर वाढू शकते.

हिरव्या पालेभाज्या, भरड धान्य, डाळी आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ आदीचा आहारात समावेश करावा. तर तळलेले, प्रोसेस्ड आणि जास्त खारट पदार्थ बंद करावेत.

दररोज चालायला जावे, योग हलका व्यायाम केल्याने इन्सुलिन चांगले काम करते. यामुळे शरीर ग्लुकोजचा योग्य प्रकारे वापर करते. आणि शुगर नियंत्रात राहाते.

जास्त वजन झाले तर शुगर वाढण्याचा धोका असते. संतुलित आहार आणि एक्टीव्ह लाईफस्टाईलने वजन नियंत्रित केल्याने शुगर लेव्हल सांभाळणे सोपे जाते.

जास्त तणावाने हॉर्मोन असंतुलित होतात.ज्याने शुगर वाढू शकते. मेडिटेशन, दीर्घ आणि खोल श्वास,पुरेशी झोप यामुळे तणावात कमतरता येते.

रोज ७ ते ८ तास झोप घ्या, सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि वेळोवेळी शुगर चेक करा.त्यामुळे शुगर नियंत्रात रहाते.