युपी-बिहार नव्हे या सुशिक्षित राज्यात आहे देशातील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानक, पाहा कोणते ?
Created By: Atul Kamble
8 feb 2026
पेरुंगलाथुर (तामिळनाडू ) : हे रेल्वेस्थानक दक्षिण रेल्वे झोनच्या चेन्नई रेल्वे डिव्हीजनमध्ये आहे. भारतीय रेल्वे रेल स्वच्छ पोर्टलनुसार भारताचे सर्वात अस्वच्छ स्थानक आहे.
गिंडी (तामिळनाडू ) :चेन्नई बीच-चेंगलपट्टू सेक्शनवरील हे छोटे रेल्वे स्थानक QCI रिपोर्टनुसार भारताचे दुसरे सर्वाधिक अस्वच्छ स्थानक आहे.
शाहगंज (युपी ) : शाहगंज जंक्शन सर्वात अस्वच्छ स्थानकांपैकी एक आहे. युपीची मथुरा आणि कानपूर सेंट्रल स्थानक देखील सर्वात अस्वच्छ स्थानकाच्या यादीत समाविष्ट आहेत.
सदर बाजार (दिल्ली ):हे रेल्वे स्थानक देशातील अस्वच्छ स्थानकांपैकी एक आहे. साडंपाणी बाहेर टाकण्याची दुरावस्था आणि कचरा यामुळे या नंबर अस्वच्छ स्थानकात येतो.
ओट्टापलम ( केरळ): केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील ओट्टापलम स्थानक, 2021 मध्ये मेकओव्हर होऊनही भारताच्या सर्वात अस्वच्छ स्थानकांपैकी एक आहे.
देशाच्या सर्वात अस्वच्छ स्थानकात पाटणा,मुझफ्फरपुर,अररिया कोर्ट, झाँशी, बरेली ही रेल्वेस्थानके, तामिळनाडूचे वेलाचेरी, गुडुवांचेरी रेल्वे स्थानके अस्वच्छ स्थानकात समाविष्ठ आहेत.
या रँकींगला क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडिया ( QCI) ने जारी केले आहे. या सर्वेक्षणात 1.2 दशलक्ष प्रवाशांच्या मतांचा आधार घेतला आहे.
QCI च्या रिपोर्टनुसार देशाची 75 रेल्वे स्थानके A1 श्रेणीत येतात.जी वार्षिक 75 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न देतात.देशातील 332 स्थानके A श्रेणीत वर्गीकृत केली आहेत. जी 6 ते 50 कोटी रुपयांच्या दरम्यान महसुल मिळवून देतात.