शरीरात व्हिटामिन्स C च्या कमतरतेची लक्षणे नेमकी काय असतात ?

Created By: Atul Kamble

7 feb 2026

व्हिटामिन्स सी आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. हे इम्युनिटी मजबूत करते. जखमा लवकर बऱ्या करण्यास मदत करते.त्वचा आणि हाडांचे आरोग्य राखते.

असंतुलित आहार, जंक फूडचे जास्त सेवन,फळ आणि भाज्यांची कमी यामुळे व्हिटामिन्स सीची उणीव जाणवते.शरीर स्वत:व्हिटामिन सी तयार करु शकत नाही.त्यामुळेच आहार महत्वाचा आहे. चला याच्या कमतरतेची लक्षणे पाहूयात.

व्हिटामिन्स सी च्या कमतरतेने शरीर लवकर थकते. सामान्य काम करण्यासही शरीर नकार देते. कारण शरीरात एनर्जी नसल्याने कामात लक्ष लागत नाही.

 व्हिटामिन्स C च्या कमतरतेने हिरड्यांचे आजार होतात, सुज आणि रक्त येते. दीर्घकाळ हिरड्याचे आजार होऊ शकतात.

व्हिटामिन सी च्या कमतरतेने त्वचा रुक्ष आणि बेजीव होते. जखमांना भरण्यास वेळ लागतो.त्वचेवर छोटे-छोट डाग दिसतात.

Vitamin C च्या कमतरतेने शरीरात जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. कापणे आणि खरचटने असा किरकोळ जखमा बऱ्या होण्यास वेळ लागतो.त्यामुळे जखमी चिघळण्याची भीती असते.

Vitamin C च्या कमी असेल तर इम्युनिटी कमजोर होते. सर्दी,खोकला आणि फ्लू सारखे आजार वारंवार होऊ लागतात. आणि संक्रमण लवकर बरे होत नाही.