डायबिटीजचे रुग्ण कोणती फळे खाऊ शकतात?

Created By: Atul Kamble

6 feb 2026

डायबिटीजच्या रुग्णाने त्यांच्या आहारावर लक्ष ठेवायला हवे.कारण जास्त कार्ब्स, गोड ग्लायसेमिक फूड्स ब्लड शुगर वेगाने वाढवतात.

 फळात अनेक पोषक तत्वांसह नैसर्गिक साखर असते. त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी कोणती फळे खावीत असा प्रश्न पडतो.

डायबिटीजचे रुग्ण फळे खाऊ शकतात.परंतू त्यांनी फळांची निवड काळजीपूर्वक करावी असे डॉ. किरन गुप्ता म्हणतात.

तुम्ही सिजनल फळे खाऊ शकता.मात्र जास्त गोड फळे  खाऊ नयेत.प्रोटीन असलेल्या बदाम, अक्रोडसह फळे खाऊ शकता. 

स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्ल्युबेरी, जांभूळ, तसेच लिंबू, केळी, संत्री, पेर आणि सफरचंद खाऊ शकता.

ब्रेकफास्ट आणि लंच यांच्या मधल्या काळात फळे खाऊ शकता.शक्यतो रात्रीची फळे खाऊ नयेत.कारण रात्रीची साखर त्यामुळे वाढू शकते.

अनेक फळे ही सालीसकट खावीत.फळांचा ज्यूस पिणे टाळावे. कारण त्यामुळे शुगर वाढते.