लिंबू आरोग्यदायी मानले जाते. लिंबाच्या रसाप्रमाणेच सालीमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात.
15 July 2025
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. लिंबूच नाही तर लिंबूच्या सालीसुद्धा खूप उपयोगी असतात.
लिंबूच्या साली रस काढल्यानंतर फेकून दिल्या जातात. परंतु या साली तुमच्या गार्डनमध्ये तुम्हाला कमी येणार आहेत.
लिंबूमध्ये नैसर्गिक अम्ल असते. जे डास आणि कीटकांना पळवून लावते. यासाठी लिंबूच्या साली टाकून पाणी उकळून स्प्रे बनवा. तो स्प्रे मारल्यावर कीटक दूर पळून जातील.
लिंबूच्या सालींमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नीशियम असतात. त्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात.
लिंबूच्या साली तुम्ही रोपांच्या मुळांवर टाकून त्यावर माती टाकून द्या. ते रोपांसाठी चांगले नैसर्गिक खत असणार आहे.
मुंग्यांना लिंबूवर्गीय फळांचा वास आवडत नाही. त्या तुमच्या बागेत येऊ नये म्हणून मुंग्यांच्या मार्गावर लिंबाची साल ठेवा.