अक्रोडला सुका मेव्याचा राजा म्हटले जाते. आक्रोड पोषक तत्वांचे एक मोठे भंडार देखील आहेत.
7 June 2025
अक्रोडचा पॅटर्न मेंदूच्या पेशीप्रमाणे दिसतो. त्यामुळे मेंदूसाठी ते फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. परंतु त्याचे खरे कारण जाणून घेऊ या.
बुद्धिमत्ता वाढवण्याची चर्चा होत असताना अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. त्या मागील कारण आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांनी सांगितले.
अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की बदाम मेंदूसाठी जास्त फायदेशीर आहेत की अक्रोड? किरण गुप्ता म्हणतात की दोन्हीही फायदेशीर आहेत. पण अक्रोड तुमच्या मेंदूच्या कार्यासाठी जास्त फायदेशीर आहेत.
अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा 3 फॅटी एसिड असते. जे मेंदूसाठी सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे.
ओमेगा 3 ब्रेनमधील न्यूरॉन्स हेल्दी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. तसेच लक्ष केंद्रित करणे यासारखे फायदे होतात.
तज्ज्ञ म्हणतात, की अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु दिवसातून फक्त दोन ते तीन अक्रोड खावेत आणि ते पाण्यात भिजवून खाणे चांगले.
अक्रोड स्मरणशक्ती वाढवण्यासोबत हृदय, त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. ते रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते.