Created By: Atul Kamble

21 April 2026 

घरातून पालींना घालवायचे आहे, हे जालीम उपाय करुन पाहा...

Created By: Atul Kamble

 कांदा आणि लसणाचा रस पाण्यात मिसळा आणि त्यामध्ये थोडे मीठ टाकून स्प्रे तयार करा, हा स्प्रे भिंतींवर, खिडक्यांच्या चौकटीवर फवारा याच्या तीव्र वासामुळे पाली पळून जातात

पाण्यात काळी मिरीची पावडर मिसळून स्प्रे तयार करावा आणि स्प्रे थेट पालीवर मारल्यास त्या पळून जातात.

अंड्याचे कवच पालीच्या मार्गांवर किंवा खिडक्यांच्या कडेला अडकवून ठेवा, त्यांच्या वासाने पाली पळून जातात.

कॉफीची पावडर आणि तंबाखूची पावडर एकत्र करून त्याच्या पाण्याच्या मदतीने लहान गोळ्या बनवून पालीच्या मार्गांवर ठेवा.त्याच्या तीव्र वासाने पाली फिरकणार नाहीत.

 नेफ्थलीन गोळ्यांना ( डांबर गोळी ) कपाटाच्या मागे, किचनच्या कट्ट्यांवर किंवा सिंकखाली ठेवाव्यात, पालीने पळून जातात.

पालींना मोरपंखाचा वास आणि आकार आवडत नाही. त्यामुळे घरातील कोपऱ्यात मोरपंख ठेवल्याने देखील पाली आजबाजूला भटकत नाहीत.