हृदयाचे आरोग्य जपण्याचे  7 सोपे उपाय कोणते ?

14 November 2025

Created By: Atul Kamble

हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे, तृणधान्ये आणि ड्रायफ्रुट्स खावेत, जास्त तेल,मीठ आणि जंक फूड खाऊ नयेत

रोज किमान 30 मिनिटं चालावे किंवा हलका व्यायाम करावा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले रहाते. हार्ट मजबूत होते.

तीव्र तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर ताण येतो.मेडिटेशन,योग आणि दीर्घ श्वासाने तणाव कमी होतो.

दररोज 7-8 तासांची झोप हृदय आणि मेंदू दोन्हींना आरोग्यदायी ठेवते. झोपेच्या कमतरतेने ब्लड प्रेशर आणि स्ट्रेस वाढू शकतो.

धुम्रपान आणि अल्कोहोल हृदयाच्या धमन्यांना कमजोर करते.यापासून दूर राहिल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

जास्त वजनाने हृदयावर ताण येतो. सकस आहार आणि एक्टीव्ह लाईफस्टाईलने बीपी आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये रहातो.

 वेळोवेळी ब्लड प्रेशर,शुगर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करा,यामुळे हृदयाचा कोणती समस्या वेळीच लक्षात येते.