कांदा हा महाराष्ट्रातील घराघरात रोजचा आहार आहे. कांदा खाल्याने अनेक फायदे होतात. 

7 March 2025

कच्चा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. कच्चा कांदा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो आणि रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवतो. 

कांद्यात पोटॅशियम असल्यामुळे कांद्यामुळे हृदय निरोगी राहते. अनेक वेळा कांदा खरेदी करताना किंवा कांदा कापताना कांद्यावर काळे डाग पडल्याचे लक्षात येते. 

कांद्यावरील काळे डाग कधी वरच्या बाजूला तर कधी कांद्याच्या आतही दिसतात. कांद्याची थोडी सालटी काढली तर ते निघून जातात.

कांद्यामध्ये जे काळे येते ती एक बुरशी आहे. कांद्यामध्ये आढळणारी ही बुरशी एस्परगिलस नायजर (Aspergillus Niger) आहे. ती मातीत आढळते.

एस्परगिलस नायजरमुळे कांद्यामध्ये काळे बुरशी येते. हे एक सामान्य अन्न दूषित आहे. यामुळे कोणताही रोग होत नाहीत. पण ऍलर्जी होऊ शकते.

साधारणपणे ही बुरशी रोग लाल कांद्याच्या तुलनेत पांढऱ्या कांद्यामध्ये जास्त आढळतो कारण त्यात कमी फिनोलिक घटक असतात.