9 November 2025
Created By: Atul Kamble
थंडीत अंजिर खाण्याचे अनेक प्रकारचे फायदे असतात
अंजिरात अनेक पोषक तत्वे असतात जी शरीराला फायद्याची असतात.
त्यामुळे थंडीत अंजिर खाण्याचे नेमके फायदे काय हे पाहूयात.
थंडीत अंजिर शरीराला आतून गरम राखण्याचे काम करते
अंजिरातील पोषक तत्वामुळे शरीरातील रोग प्रतिरोधक क्षमता वाढते.
अंजिरात भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे बद्धकोष्ठता आणि एसिडीटीपासून आराम मिळतो
अंजिरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असतो. त्यामुळे हाडे मजबूत बनवण्यास मदत होते
अंजिरातील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते.
(डिस्क्लेमर: ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)