22 November 2025
Created By: Atul Kamble
जर पुरेशी झोप घेऊन डोळ्याखाली काळी वर्तुळे येत असतील तर आयर्नची कमतरता असू शकते. तुम्ही पालक,खजूर, राजमा सारखे पदार्थाने शरीरातील आयर्नची कमी पूर्ण करु शकता.
तुमचे शरीर हायड्रेटीड झाले नाही तर डोळ्याच्या खालची त्वचा डल होते. डार्क सर्कल बनतात. त्यामुळे पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थांचा आहारात वापर करा.
एलर्जी वा सायनसमुळेही डार्क सर्कल होतात. अशा स्थितीत डोळ्याच्या खालील नसात रक्त जमते. त्यामुळे डार्क रंगाचे सर्कल बनते. यासाठी तुम्ही वाफ,कोमट पाण्याचा वापर करु शकतो.
तणाव -चिंता यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे होतील. यासाठी मॅग्नेशियम रिच फूड्सचे सेवन करावे. आणि तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा.
आजकाल लोकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे, हे देखील डार्क सर्कलचे कारण आहे.यासाठी 20-20-20 चा रुल फॉलो करा.म्हणजे 20 मिनिटात 20 सेंकदापर्यंत 20 सेमीपर्यंत पाहावे.
तुम्ही आठ तास जरी झोपत असाल परंतू ती झोप चांगल्या दर्जाची नसेल तरी डार्क सर्कल होऊ शकतात. त्यासाठी झोपण्याआधी मोबाईल तासभर पाहू नका,झोपण्याआधी कोमट पाण्याने अंघोळ करु शकता.
काही लोक जास्त वेळ उन्हात काम करतात. त्यामुळेही डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. जास्त ऊन घेतल्याने त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि डार्क सर्कल येऊ शकतात.