जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याच्यात अनेक पोषक तत्व असतात.

23 May 2025

Created By : जितेंद्र झंवर

जांभळामधील काही गुणधर्मांमुळे मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात राहते. तसेच डोळे देखील चांगले राहतात. 

जांभळामध्ये व्हिटॅमीन सी, बी 12 असते. कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट याशिवाय ऍन्टीऑक्सीडंन्ट असतात. 

आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता म्हणतात, जांभूळमधील ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेह (ब्लड शुगर) नियंत्रणात राहते.

तज्ज्ञांनी सांगितले की, जांभळामध्ये अँथोसायनिन हा घटक असतो. जे आपल्या पेशींसाठी चांगले आहे आणि रक्त वाढवण्यास मदत करते.

जांभळात फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे पोट स्वच्छ होते. अपचनाचा त्रास होत नाही. 

जांभूळात कॅलरीज कमी असतात. तसेच फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी वजन कमी करण्यास मदत मिळते.

जांभळात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात. त्यामुळे त्वचेसाठी देखील ते फायदेशीर असतात.