मानवाच्या आहारात फळांचे महत्व खूप आहे. फळांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. 

6 June 2025

नियमित सफरचंद खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

सफरचंद खाल्यामुळे आरोग्य चांगले राहणार आहे. रक्तवाहिन्या बंद होण्याचे कारण असलेले Bad LDL Cholesterol सफरचंदच्या सेवनामुळे नष्ट होईल.

सफरचंद ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हे फक्त ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवत नाही तर कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. 

मेडिकल न्यूज टुडेनुसार, 2019 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामुळे रोज दोन सफरचंद खाल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. 

सफरचंदमध्ये एंटीऑक्सीडेंट आणि फ्लेवोनोइड असते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. हृदयाच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर आहे. 

सफरचंदचे सेवन नियमित केल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात.