किडनी शरीराचा महत्वाचा अवयव आहे. रक्त स्वच्छ करणे, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे आणि पाण्याचे संतुलन करणे अशी काम किडनी करते. याचे आरोग्य खराब झाले तर संपूर्ण शरीरच आजारी होते.
डायबिटीज, उच्च रक्तदाब, कमी पाणी पिणे, जास्त पेन किलर गोळ्यांचे सेवन आणि चुकीचा आहार यामुळे किडनी खराब होते.
किडनी योग्य प्रकारे काम करत नसेल तर शरीरात पाणी जमा होणे सुरु होते.त्यामुळे पाय, टाचा, हात आणि चेहऱ्यावर सूज येते.
वारंवार लघवीला येणे, कमी लघवी होणे, लघवीचा रंग डार्क होणे, ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे आहेत.
किडनी खराब झाल्याने टॉक्सिक तत्वे शरीरात जमतात. त्यामुळे काम न करताही प्रचंड थकवा येतो. सातत्याने थकव्याने कमजोरी येते.
किडनी खराब झाली असेल तर पचन यंत्रणा प्रभावित होते. भूक कमी लागते. उल्टी सारखे वाटते आणि जेवू सारखे वाटत नाही.
किडनी योग्य प्रकारे काम करत नसेल तर घाण बाहेर न पडल्याने रक्तात टॉक्सिन वाढते आणि त्वचेवर वारंवार खाज येण्यास सुरुवात येते.