शरीरात कॅल्शियमची कमतरता असण्याची लक्षणे काय ?

18 october 2025

Created By: Atul Kamble

कॅल्शियम शरीराची हाडे आणि दातांना मजबूत बनवते.स्नायूंच्या हालचाली, नसांना सिग्नल आणि हृदयाच्या ठोक्यांना कंट्रोल करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

चुकीचा आहार, दूधजन्य पदार्थांची कमी, विटामिन डीची कमतरता, थायरॉईडची समस्या आणि काही औषधांचा साईड इफेक्टने शरीरातील कॅल्शियमची पातळी घसरते

 बराच काळ कॅल्शियमची कमतरता राहिली तर ऑस्टीयोपोरोसिस, हाडांची कमजोरी, दात दुखी, मुलांमध्ये हाडे वाकणे अशा समस्या येऊ शकतात.

कॅल्शियची कमतरता झाल्यावर पाय, हात वा पाठीच्या स्नायूत वारंवार चमक किंवा गोळे येतात. हाडे दुखणे, वा तुटण्याची भीती असते. चालताना अडचणी येतात

नखे कमजोर होऊन तुटणे, केस गळणे अशा समस्या कॅल्शियमच्या कमतरतेने होऊ शकतात.

कॅल्शियमच्या कमजोरीने शरीरात एनर्जी लेव्हल घसरते,त्यामुळे दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवते.

दात कमजोर होणे, हिरड्यांमध्ये दुखणे आणि चेहरा किंवा बोटात झिणझिण्या येणे हे देखील कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत.