2 november 2025
Created By: Atul Kamble
व्हिटामिन्स D हे आवश्यक पोषक तत्व आहे. हे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषणाला मदत करते. हे हाडे, दात आणि मासपेशींच्या मजबूतीसाठी गरजेचे आहे.
व्हिटामिन्स D च्या कमतरतेने शरीराचे अनेक पद्धतीचे नुकसान होते.हाडे कमजोर होणे, इम्युनिटी कमी होणे, डिप्रेशन, मूड स्विंग्स, थकवा, हृदयविकार धोका तसेच ऑस्टीयोपोरोसिसचा समावेश आहे.
व्हिटामिन्स डीच्या कमतरतेने शरीरात अनेक लक्षणे दिसतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नये,चला पाहूयात लक्षणे
व्हिटामिन्स D च्या कमतरतेने शरीरात एनर्जीची पातळी कमी होते. कामाशिवाय थकवा येतो.झोप पूर्ण होऊन ताजेपणा वाटत नाही.
Vitamin D च्या कमतरतेने हाडे कमजोर होऊन त्यात सूज आणि वेदना होते.पाठ, कंबर आणि पाय दुखतात.
व्हिटामिन्स डीच्या उणीवेने पायऱ्या चढताना दुखते.वजन उचलताना अडचणी येतात.स्नायूंमध्ये ताठरता येते.
इम्युनिटी कमजोर झाल्याने वारंवार सर्दी-खोकला आणि अन्य संसर्गजन्य रोग होतात