गुडघेदुखी कशामुळे होते ? काय आहेत नेमकी कारणे ?

19 october 2025

Created By: Atul Kamble

वय वाढल्याने गुडघ्याच्या सांध्यातील कुर्चा ( कुशन-cartilage ) झीज होऊ लागते.यामुळे सूज आणि वेदना सुरु होते. यास ऑस्टीओआर्थरायटीस म्हणतात असे मॅक्स हॉस्पिटलचे आर्थोपेडिक विभागाचे डॉ.अखिलेश यादव यांना सांगितले.

रुमेटॉईड आर्थरायटीस - हा एक ऑटोइम्युन आजार असून यात शरीराची इम्यून सिस्टीम स्वत:च्या सांध्यावर हल्ला करते. त्यामुळे वेदना, सूज आणि सांधे अखडतात

 युरिक एसिड - शरीरात युरिक एसिडची पातळी वाढली की सांध्यात ते क्रिस्टलच्या रुपात जमा होऊन तीव्र वेदना आणि सूज येते.

 जखम - पडल्याने वा जखम झाल्याने गुडघ्याच्या लिगामेंट फाटू शकतात. ज्यामुळे अचानक तीव्र वेदना आणि सूज येते.

 लठ्ठपणा - अधिक वजनाने गुडघ्यावर दबाव वाढतो. त्याने सांध्याची हाडे लवकर झीजतात. हे वेदनेचे मोठे कारणार आहे.

 विटामिन डी- कॅल्शियमची कमी - हाडांना मजबूत ठेवणारे पोषक तत्वांची कमतरतेने घुडगे कमजोर होतात आणि वेदना होऊ लागतात.

सूज - काही वेळा बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे सांध्यावर संक्रमण होते. ज्यामुळे अचानक वेदना,ताप आणि सूजेसारखी लक्षणे दिसतात