विटामिन E च्या कमतरतेने कोणत्या आजारांचा धोका ?

06 August 2025

Created By: Atul Kamble

विटामिन E शरीरातल्या पेशींना फ्रि रेडिकल्सपासून वाचवते, यास इम्युनिटी मजबूत करते. याने त्वचा, डोळे, स्नायू,मेंदूसाठी महत्वाचे मानले जाते

जर शरीरात विटामिनची कमतरता असेल तर हळूहळू समस्या येतात.खूपकाळ कमी असेल तर गंभीर आजार होतात

विटामिन ई नर्व्हस सिस्टीमसाठी महत्वाचे आहे. याच्या कमरतेने हातपाय सून्न पडणे, झिणझिण्या येणे, तोल जाण्याची समस्या अशी लक्षणे दिसतात

 विटामिन ई इम्युनिटीसाठी महत्वाचे आहे. जेव्हा याची कमरता असते रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.वारंवार आजारी पडायला होते

या विटामिन्सची कमी डोळ्यांची दृष्टी कमी होते. धुरकट दिसणे, रेटिनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. हळूहळू दृष्टी कमजोर होते

या विटामिनच्या कमीने सतत थकवा जाणवणे, स्नायू दुखणे वाढणे या तक्रारी येऊ शकतात

 ( डिस्क्लेमर:  ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांना सल्ला घ्या )