Fatty Liver ची समस्या असेल तर काय खाऊ नये ?
Created By: Atul Kamble
28 December 2025
लिव्हरमध्ये चरबीची पातळी वाढते त्याला फॅटी लिव्हर म्हणतात.जे लोक जास्त प्रोसेस्ड फूड्स खातात त्यांना फॅटी लिव्हरची समस्या होण्याची शक्यता असते.
फॅटी लिव्हर दोन प्रकारचे असतात. एक दारुमुळे होणारा तर दुसरा गैर मद्य फॅटी लिव्हर
फॅटी लिव्हरचा उपचार डाएटमध्ये सुधारणा केल्याने होतो.या आजारात कोणते पदार्थ खाऊ नयेत हे पाहूयात..
दारुच्या जास्त सेवनाने लिव्हर खराब होऊ शकते. त्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो.एवढेच लिव्हर सिरोसिस देखील होऊ शकतो.
फॅटी लिव्हर झाल्यास अत्यंत गोड पदार्थ खाऊ नयेत.त्याने ब्लड शुगर वाढते.लिव्हरमध्ये चरबीही वाढते.
फॅटी लिव्हरमध्ये आईस्क्रीम, गोड पेये,कार्बोनेटेड पेय, कँडी पासून दूर रहावे.
तळलेल्या आणि खारट भोजनाने वजन वाढते आणि त्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो.
पास्ता, सफेद ब्रेड, बर्गर बन्स आदी सर्व शरीराला हानिकारक असतात फॅटी लिव्हर असेल तर यापासून दूर रहावे.
प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतो.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )
रक्तवाढीसाठी व्हिटामिन सी आणि आयर्नने भरपूर 5 पदार्थ पाहा