मुघल बादशहांच्या मौल्यवान दागिन्यांचं पुढे काय झालं?

28 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

1739 मध्ये पर्शियाचा नादिरशाह याने दिल्ली लुटून मुघलांचा मोठा खजिना नेला.

प्रसिद्ध मयूर सिंहासनही त्याने पर्शियाला नेले.

नादिरशाहच्या मृत्यूनंतर सिंहासन फोडले गेले आणि रत्ने वेगवेगळीकडे पसरली.

कोहिनूर हिरा अफगाण आणि शीख राज्यकर्त्यांकडे गेला.

1849 मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि आता ब्रिटिश क्राउन ज्यूअल्समध्ये आहे.

उरलेली बरीच रत्ने संग्रहालयांत किंवा खासगी संग्रहात आहेत, तर काहींचा ठावठिकाणा अज्ञात आहे.