शरीरात शुगरची पातळी घसरल्याने काय होते ?

20 october 2025

Created By: Atul Kamble

जेव्हा रक्तातील शुगरची पातळी सामान्याहून खूप खाली घसरते तेव्हा हायपोग्लायसीमिया ही स्थिती होती. शुगर शरीर आणि मेंदूला एनर्जी देत असते. जेव्हा ती कमी होते तेव्हा शरीर नीट काम करत नाही.

 बराच वेळ उपाशी राहणे, जास्त व्यायाम करणे, इन्सुलिन किंवा डायबेटीज औषधांचे अधिक सेवन करणे, हार्मोन्स असंतुलन,लिव्हर वा किडनीच्या समस्या देखील यास जबाबदार असते.

डॉ.जुगल किशोर सांगतात की शरीत शुगर कमी झाल्याने थकवा, चिडचिडेपणा, कमजोरी, हातपाय थंड होणे, चक्कर येणे असे संकेत मिळाले तर शरीराला तातडीने एनर्जीची गरत असते

जर वेळीच लक्ष न दिल्यास डोकेदुखी, हृदय धडधडणे,घाम येणे, नजर धूसर होणे, बोलण्यात अडचणी येणे, बेशुद्ध पडणे अशी धोकादायक स्थिती येऊ शकते. लागलीच उपचारांची गरज असते.

शुगर मेंदूची मुख्य एनर्जी असते. शुगर कमी झाल्याने मेंदू नीट काम करत नाही.त्यामुळे एकाग्रता करता येत नाही. विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता प्रभावित होते. 

हायपोग्लायसिमिया पासून वाचण्यासाठी वेळेत जेवावे, संतुलित आहार घ्यावा, गोड पदार्थ सोबत बाळगावे, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घ्यावीत

शुगर लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी वेळोवेळी रक्तातील साखर तपासावी, तसेच नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेतल्यास हायपोग्लायसिमियाच्या धोक्यास कमी करता येते