3 september 2025
Created By: Atul Kamble
सामान्य पेक्षा जास्त शुगर लेव्हल असते परंतू डायबिटीज एवढी नाही. तेव्हा डायबिटीजचे हा सुरुवातीचा टप्पा मानतात. वेळेत हा नियंत्रित करता येतो
चुकीचा आहार,फिजिकल एक्टीव्हीटीची कमरता,लठ्ठपणा, जेनेटिक कारणाने शरीर इन्सुलिनचा योग्यप्रकारे उपयोग करु शकत नाही.त्यानु शुगर वाढते
प्री-डायबिटीजने थकवा वाढतो.शरीरात ऊर्जा संतुलित रहात नाही. त्यामुळे कामावर परिणाम होतो
रक्तात शुगर अनियंत्रित झाल्याने वारंवार तहान लागते.जेवणानंतरही लवकर भूक लागते.ही लक्षणे दुर्लक्षित करु नका
प्री-डायबिटीजमध्ये वजन अचानक वाढते.पोट आणि कमरेजवळ चरबी वाढते.काही प्रकरणात कारणाशिवाय वजन घटू लागते
शरीर जेव्हा अतिरिक्त शुगर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.तेव्हा वारंवार लघवीला येते.हे प्री-डायबिटीचे महत्वाचे लक्षण आहे
त्वचेवर काळे डाग पडणे, खाज येणे,डोळ्यांनी धुसर दिसणे हे या स्थितीचे लक्षण असू शकते.
प्री-डायबिटीजचे डायबिटीजमध्ये रुपांतर होऊ नये म्हणून जीवनशैलीत बदल करावा लागतो