मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्समध्ये काय फरक आहे?

31 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

हैदराबादमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी 31 मे रोजी आहे. चला जाणून घेऊयात मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्समधील फरक काय?

मिस वर्ल्ड स्पर्धेच आयोजन युकेमधील मिस वर्ल्ड ऑर्गेनायझेशन करते. याचे फाउंडर एरिक मोर्ले आहेत. याची सुरुवात 1951 पासून झाली होती. याचं मुख्यालय लंडनमध्ये आहे. 

मिस युनिवर्सची सुरुवात 1952 मध्ये झाली. याचं आयोजन जेकएन ग्लोबल ग्रुपचे मिस युनिवर्स ऑर्गेनायझेशन करते. याचं हेडक्वॉर्टर अमेरिकेत आहे. 

मिस वर्ल्ड स्पर्धेच्या टॅगलाईन ब्यूटी विथ द पर्पजनुसार सर्व लक्ष हे दान, सामाजिक सेवा आणि मानवी मदतीवर असते. मिस युनिवर्सचं लक्ष महिला सक्षमीकरण, आत्मविश्वास आणि लीडरशीपवर असते. 

मिस वर्ल्डची निवड बुद्धीमता, स्पोर्ट्स, मॉडलिंग, मुलाखत आणि ओव्हरऑल पर्सनालिटीच्या आधावर होते. 

मिस युनिवर्सची निवड स्विमसूट कॉम्पिटीशन, ईव्हनिंग गाऊन, पर्सनल इंटरव्यू, फायनल क्वेशन, आत्मविश्वास, बुद्धीमत्ता आणि संवाद कौशल्याच्या आधारावर होते.

भारतात आतापर्यंत सहा मिस वर्ल्ड आहेत. यात रीता फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोप्रा आणि मानुषी छिल्लर आहेत. तर मिस युनिवर्सच्या यादीत सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू आहे.

घरात आरसा कुठे लावला पाहीजे? जाणून घ्या वास्तुशास्त्र