Rupay, Visa आणि Mastercard मध्ये काय आहे फरक,कोणते क्रेडिट कार्ड बेस्ट?

14 July 2025

Created By: Atul Kamble

आर्थिक संकटात क्रेडिटकार्ड मदतीला येते याद्वारे काहीही खरेदी करता येते,नंतर पैसे भरता येतात

 सप्टेंबर २०२४ पासून ग्राहक आता मास्टरकार्ड,रुपे वा व्हीसा पैकी कोणतेही कार्ड निवडू शकतात.आधी हे बँकेच्या हातात होते

तिन्ही कार्ड पेमेंट नेटवर्क कंपन्या आहेत,ज्या कॅशलेस ट्राक्झक्शनी सुविधा देतात.रुपे भारतीय कंपनी तर इतर दोन विदेशी कंपन्या आहेत

रुपेला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI) संचालित करते.हे कार्ड भारतात कार्यरत असून कमी सर्व्हीस चार्ज लागतो

व्हीसा,मास्टरकार्ड जगभरात स्वीकारले जातात.त्याने आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण करता येते.त्यांचे सर्व्हीस चार्जेस जास्त आहेत.

जर तुम्हाला अधिक रिवॉर्ड,पॉईंट्स आणि फॉरेन ट्राक्झक्शन करायचे असेल तर व्हीसा-मास्टरकार्ड चांगले,रुपे कार्ड कमी चार्जसाठी बेस्ट आहे.