दिल्ली हे शहर अतिशय प्राचीन आहे. अगदी महाभारत काळापासून हे शहर आहे.
8 July 2025
दिल्ली अनेक राजांची राजधानी राहिली. त्यात मौर्य, गुप्त, राजपूत, मुगल आणि ब्रिटिश यांचा समावेश आहे.
महाभारताच्या काळात आजच्या दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ होते. हस्तिनापूरच्या फाळणीनंतर युधिष्ठर यांना हा भाग मिळाला होता.
युधिष्ठर यांना इंद्रप्रस्थ मिळाले, त्यावेळी त्या ठिकाणी खांडव वन होते. त्या ठिकाणी एक घनदाट जंगल होते.
खांडव वनात अनेक नागांचे वास्तव्य होते. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जून यांच्या प्रयत्नांनी खांडव वनाचे एका सुंदर शहरात रूपांतर झाले.
इंद्रप्रस्थ आज दिल्लीचा एक भाग आहे. त्या भागाला दक्षिण दिल्ली म्हटले जाते.
बाराव्या शतकात राजपूत राजा अनंगपाल तोमर यांनी त्याचे नाव ढिल्लिका ठेवले. परंतु हळूहळू त्याला दिल्ली म्हटले जाऊ लागले.
हे ही वाचा... आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर