गुडघे दुखीवर हे रामबाण उपाय आजमावून पाहा  ?

Created By: Atul Kamble

26 FEB 2026

गुडघे दुखी हा आजकाल प्रत्येक वयातील एक सर्वसामान्य समस्या बनली आहे.

 थोडी सावधानता आणि रोज चांगल्या सवयींना आपलेसे करुन काही प्रमाणात गुडघे दुखीवर आराम मिळवता येतो.

रोज सकाळी कोमट पाण्याने गुडघे शेकल्याने सूज कमी होते. आणि गुडघ्याच्या आखडण्यापासून सुटका होते.

 हळदीचे दूध वा हळद - मधाचे सेवन करावे, कारण हळदीत नैसर्गिक सूजविरोधात गुण आढळतात.

वजनावर नियंत्रण आणा, कारण जास्त वजनाने गुडघ्यावर अतिरिक्त ताण येतो आणि गुडघे दुखू शकतात.

रोज हलकी एक्सरसाईज करावी, जसे स्ट्रेचिंग, वॉक वा योगा याने गुडघ्याचा लवचिकपणा वाढतो.

राईच्या किंवा नारळ तेलाने हलकी मालिश केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले वाढते आणि गुडघे दुखी कमी होते