2 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
तिबेटीयन आध्यात्मिक गुरु दलाई लामा हे 6 जुलै रोजी 90 वर्षांचे होतील. पुढील दलाई लामा कसे निवडले जातील हे ते जाहीर करतील.
सध्याचे दलाई लामा हे फक्त दोन वर्षांचे असतानाच दलाई लामांचे अवतार मानले गेले. त्यांची धार्मिक गुरु म्हणून निवड केली गेली.
दलाई लामा यांचे खरे नाव तेन्झिन ग्यात्सो आहे. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना ल्हासा येथे आणण्यात आले आणि तिथे दीक्षा घेतली.
दलाई लामा हे काही नाव नाही ही एक उपाधी आहे. तेन्झिन ग्यात्सो यांची 14वे दलाई लामा म्हणून ओळख आहे.
दलाई लामा याना तिबेटीयन बौद्धांचे आध्यात्मिक गुरु मानले जाते. दया, करुणा, अहिंसा आणि ज्ञानाचे प्रतीक असते.
दलाई लामा भले बौद्ध धर्म गुरु आहेत. पण त्यांचा संदेश प्रत्येक धर्मियांसाठी प्रेरणादायक असतो.
6 जुलैला दलाई लामा मॅक्लॉडगंजमधील निवासस्थानातून उत्तराधिकाऱ्याची घोषणा करू शकतात.