चुकीचा आहार, तळलेले पदार्थ, कमी शारीरिक हालचाल आणि तणावामुळे कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते. जे हृदयाचे आजार आणि ब्लड सर्क्युलेशनला प्रभावित करु शकते. चला तर यास नियंत्रित करण्यासाठी काय खायचे ते पाहूयात..
ओट्स आणि भरड धान्य तसेच दलियात फायबर खूप असते. जे खराब कोलेस्ट्रॉल घटवण्यास मदत करते. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.
हिरव्या पालेभाज्या, मेथी, पालक सारख्या भाज्यात एंटी ऑक्सीडेंट तत्व असते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि ब्लड वेसल्सना साफ करण्यास मदत मिळते.
अक्रोड, बदाम, आळशी आणि चिया सीड्स मध्ये चांगले फॅट्स असते. जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास सहायक आहे.
सफरचंद, पेरु आणि पेर फळांमध्ये फायबर असते. जे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे एब्जॉर्पशनला कमी करण्यास मदत करते.
फिश, आळशी सीड्स आणि अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असते. जे ट्रायग्लिसराईड घटवणे आणि हृदयास मजबूत करण्यास मदत करते.
जेवणात ऑलिव्ह ऑईल आणि राईचा तेलाचा वापर केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. आणि हृदयाचे आरोग्य चांगले होते.