या 8 गोष्टी तुम्हाला करता येत असतील तर तुम्ही एकदम फिट आहात
Created By: Atul Kamble
24 FEB 2026
आज काल फिटनेसची खूपच काळजी घेतली जाते. आपण फिट आहोत की नाही हे पाहण्याचे काही नैसर्गिक संकेत आहेत.
डॉ.पूजा चोपडा यांनी इंस्टाग्रामवर काही संकेतांची माहीती दिली आहे. ते तुमच्यात असतील तर तु्म्ही अजूनही फिट आहात
जर तुम्ही जमीनीवर बसल्यानंतर कोणत्याही आधाराशिवाय नीट उभे राहू शकत असाल तर तुमचे वजन अतिरिक्त नाही.
जर तुम्हाला भूक लागल्यानंतर चिडचिड किंवा कमजोरी वाटत नसेल तर तुमचे मेटाबॉलिझ्म संतुलित आहे.
जर तुम्हाला अलार्मच्या आधी आपोआप जाग येत असेल तर तुमचे बॉडी क्लॉक बरोबर आहे. तुमची झोप पूर्ण होत असल्याचेही हा संकेत आहे.
जर तुम्ही १० सेकंद किंवा त्याहून जास्त वेळ एका पायावर उभे राहू शकत असाल तर तुमचे संतुलन, मेंदू आणि शरीराचा ताळमेळ योग्य आहे.
जर तुम्हाला खोकताना किंवा शिंकताना कंबर पकडावी लागत नसेल तर तर तुमचे माकड हाड आणि पोटाचे स्नायू मजबूत आहेत.
जर तुम्ही शरीर मागे न वळवता पाठी पाहू शकत असाल तर तुमच्या मानेत काही त्रास नाही आणि ती लवचिक आहे याचे हे संकेत आहेत.
जर व्यायामानंतर तुम्ही लवकर थकव्यातून बाहेर पडत असाल तर तुम्ही एनर्जीची पातळी योग्य आहे आणि तुमचे शरीर लवकर रिकव्हर होत आहे.
जर तुम्ही दुपारी ३ वाजण्याच्या आसपास चहा-कॉफी न पिता थकत नसाल तर तुमची ब्लड शुगर आणि एनर्जीची पातळी योग्य आहे.
( डिस्क्लेमर : या लेखातील माहिती इंस्टा पेज drpooja.chopra वर दिलेल्या माहितीवर आधारित आहे.यास टीव्ही ९ मराठी दुजारा देत नाही )
रोज ही चार प्रकारची पाने चावून खा, वाढत्या वयाला थांबावा...