लाल किल्ला कधी आणि  कोणी बांधला ?

12 November 2025

Created By: Atul Kamble

 लाल किल्ला भारताची राजधानी दिल्लीत आहे.

याला मुघल बादशाह शाहजहान यांनी बांधले होते.

लाल किल्ल्याची निर्मिती १६३८ मध्ये सुरु झाली आणि १६४८ मध्ये पूर्ण झाली.

 शाहजहांने त्याची राजधानी आग्राहून दिल्ली येथे हलविली त्यावेळी त्याने हा लाल किल्ला बांधला

या किल्ल्याची निर्मिती लाल बलुआ दगड ( रेड स्टँड स्टोन ) पासून केल्याने त्याला लाल किल्ला म्हणतात

लाल किल्ल्याचे डिझाईन उस्ताद अहमद लाहोरी यांनी केले  होते. ज्यांनी ताजमहलचेही डिझाईन केले होते.

लाल किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट हेरिटेज स्थळ आहे.

लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकवतात.

आग्रा येथील लाल किल्ला बादशहा अकबर यांनी १५६५ मध्ये बांधला होता.