11 November 2025
Created By: Atul Kamble
शरीरात पाण्याची कमतरता, धुम्रपान, मद्य, लठ्ठपणा, तांबड्या पेशींची अधिक वाढ,हार्मोन्स असंतुलन, डायबिटीज, हार्ड डिसिज, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर वाढल्याने रक्त घट्ट होऊ शकते
शरीरात रक्त घट्ट होण्याचे अनेक लक्षणे असू शकतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
रक्त घट्ट झाल्याने पाय आणि गुडघ्यामध्ये सुज येऊ शकते. दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवू शकते असे डॉ.अजय कुमार सांगतात.
रक्त घट्ट झाल्याने डोके जड होते, किंवा दुखते. वारंवार चक्कर येण्याची समस्या होऊ शकते.
रक्त घट्ट झाल्याने छातीवर दाब येतो आणि छातीत दुखू शकते.
रक्त घट्ट झाल्याने शरीरास पुरेसा ऑक्सीजन मिळत नाही.त्यामुळे दम लागू शकतो
क्त घट्ट झाल्याने ऑक्सीजन डोळ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे धुसर दिसू शकते. किंवा नजर कमजोर होऊ शकते.