विषारी की बिनविषारी, कोणते साप जास्त जगतात ?

11 November 2025

Created By: Atul Kamble

 सापांचे वय त्याची जात, पर्यावरण आणि विषावर अवलंबून असते.विषारी साप जास्त जगतात की बिनविषारी पाहूयात....

जगातला सर्वात लांब विषारी साप किंग कोब्रा २० ते २५ वर्षे जगतो.जंगलातील शिकारचे उपलब्धता आणि चांगली इम्युनिटीमुळे त्याचे वय जास्त असते

आफ्रीकेतील खतरनाक ब्लॅक मांबा ११ ते १५ वर्षे जगतो.जास्त वेग आणि शक्तीशाली विष असल्याचे त्याचे शत्रू कमी असतात.कैदेत हा साप २० वर्षांपर्यंत जगतो.

रसेल वायपर भारतातील मृत्यूला सर्वाधिक जबाबदार साप मानला जातो. हा १५ ते २० वर्षे जगतो.मजबूत शरीर आणि लपण्याची कला याला जास्त जगवते.

 रेटिकुलेटेड पायथन हा जगातला सर्वात लांब बिनविषारी साप आहे.जो २५ ते ३५ वर्षे जगतो.कैदेत हा साप ४० वर्षांपर्यंतही जगू शकतो. 

भारतीय अजगर २० ते ३० वर्षे जगतात. जंगलात याचे सावज घटत असल्याने त्याचे सरासरी आयुष्य कमी होऊ शकते.

 बिनविषारी बोआ कॉन्स्ट्रिक्टर साप ३० ते ४० वर्षे कैदेत जगतो. जंगलात तो २० - २५ वर्षे जगतो. मजबूत शरीर आणि कमी शत्रू असल्याने याचे वय जास्त असते.

बिनविषारी गार्टर स्नेक १०-१५ वर्षे जगतो. छोटा आकार असल्याने यास लपणे सोपे जाते. थंड वातावरणात हायबरनेशनने याचे वय वाढते. 

विषारी सापांना विष तयार करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते.तर बिनविषारी साप सावजाला दाबून मारतात.त्यामुळे ते ५-१० वर्षे जास्त जगतात.

 कैदेत बिनविषारी एनाकोंडा आणि पायथन ४० वर्षांहून अधिक जगतात. चांगले अन्न, कोणताही शिकारी नसणे यामुळे यांचे वय जास्त आहे.