11 september 2025
भारतीयांची सकाळ चहाशिवाय होत नाही. अनेकांना तर चहा मिळाला नाही तर डोके दुखते
भारतीय लोक चहा सोबतच नाश्ता करत असतात.कोणी समोसे खातात, कोणी पराठा खातात.परंतू चहा बनवताना साखर केव्हा टाकतात ते पाहूयात
लोक वेगवेगळ्या पद्धतीने चहा तयार करतात. चहात साखर केव्हा टाकायची ? साखर चहाचे आधन ठेवतानाच टाकावी.किटलीत चहा करत असाल तर नंतर साखर टाकल्याने पाण्याची पातळी वाढते
घरातल्या चहापेक्षा बाहेरचा चहा नेहमी चांगला असतो.चला तर पाहूयात चहाचे कोणते प्रकार आहेत.
मसाला चहात दालचिनी, लवंग आणि काळीमिरी देखील टाकतात.पाण्यात चहा पत्ती सोबत मसालेही उकळवून हा चहा बनतो
तंदूरी चहा देखील प्रसिद्ध आहे. मातीच्या कपाला ( कुल्लड ) भट्टीत भाजून नंतर त्यावर दूधाचा चहा ओतला जातो. या चहाला तंदुरचा सुंगध येतो
काश्मीरचा कावा चहा मसाल्यापासून तयार करतात.यात दूधाचा वापर होत नाही.वेगळा मसाला असतो