एनडीएची मुलींची पहिली बॅच आज बाहेर पडत आहे.
29 May 2025
सैन्य दलाच्या इतिहासात प्रथमच १७ मुली एनडीएमधून पदवी घेऊन बाहेर पडल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या अंतरिम निकालानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे खुले करण्यात आले होते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर यूपीएससीमार्फत प्रवेश प्रक्रिया राबवून १९ मुलींची निवड करण्यात आली. त्यापैकी १७ कडेट्सने प्रशिक्षण पूर्ण केले.
एनडीएमधील प्रशिक्षणानंतर आता या सर्व मुली पुढील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यदलात आधिकारी म्हणून दाखल होणार आहेत.
भारतीय सैन्यात १९५२ पासून महिलांची परिचारिका म्हणून भर्ती झाली. परंतु अधिकारी बनण्याची संधी खूप उशिरा मिळाली.
१९९२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमीशनच्या (SSC) माध्यमातून महिलांना अधिकारी म्हणून भरती करण्याचा निर्णय झाला.
सन २००८ मध्ये शिक्षा कोर आणि मिलिट्रीच्या लीगल ब्रँडमध्ये महिलांना स्थायी कमिशन देण्यास सुरुवात झाली.
२०१५ मध्ये भारतीय हवाईदलात महिलांना फायटर जेट पायलट म्हणून हवाईदलात दाखल करण्याचा निर्णय झाला.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम