वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात महत्त्वाची असलेली कवडी कुठून येते?

20 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

भारतात कवडीला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. देवी लक्ष्मीच्या पूजेत वापर केला जातो. पण या कवड्या कुठून मिळतात माहिती आहे का?

पांढरी कवडी ही समुद्री गोगलगायीचा भाग आहे. पॅसिफिक आणि हिंदी महासागरात आढळते. 

गोगलगाय हा सागरी जीव आहे. त्याच्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट बाहेर पडतं. स्वत:च्या संरक्षणासाठी हा पदार्थ सोडते.

गोगलगाय नाजूक असते. त्यामुळे इतरांपासून संरक्षण व्हावं यासाठी कॅल्शियम कार्बोनेटने स्वताभोवती कवच तयार करते. 

गोगलगायीने तयार केलेल्या कवचाला कवडी म्हणतात. गोगलगायीचं शरीर जसं वाढतं तसा कवडीचा आकारही वाढतो. 

कॅल्शियममुळे कवच पांढरं असते. तसेच पाण्यात असल्याने कवच गुळगुळीत राहतं. 

गोगलगायीच्या मृत्यूनंतर कवच समुद्रावर तरंगते आणि किनाऱ्यावर येते. तसेच वाळूत मिसळते. 

EPF Online Withdrawal : पीएफचे पैसे ऑनलाइन कसे काढायचे?