कारले खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
6 May 2025
Created By: Jitendra Zavar
कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, आयरन, मॅग्नीशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, फायबरसह अनेक एंटीऑक्सीडेंट असतात.
कारल्यात असणारे चारेंटिन आणि पॉलीपेप्टाइड-P हे घटक ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करते.
कारल्यात फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. यामुळे अपचन, अॅसिडीटी यासारख्या समस्या दूर होतात.
कारल्यामुळे यकृतामधील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे फॅटी लिव्हर आणि काविळ यासारखे आजार होत नाही.
कारल्यामुळे व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट असतात. यामुळे प्रतिकारक्षमता चांगली होते. पर्यायाने सर्दी-खोकला अन् संक्रमणामुळे होणारे आजार होत नाही.
कारल्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म मुरुम, फोड हे आजार बरे करण्यास मदत करतात.
हे ही वाचा...
ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी मखाना खाण्याची बेस्ट पद्धत