हिमालयाची सीमा कोणत्या  पाच देशांना लागून आहे ?

Created By: Atul Kamble

4 April 2026

हिमालयाच्या रांगा २४०० किमी लांब आहेत. या रांगाल इतक्या लांब आहेत की पाच देशांशी जोडलेल्या आहेत.ते देश कोणते आहेत हे पाहूयात

 हिमालय पश्चिमेत पाकिस्तानातून सुरु होऊन पूर्वेत भूतानपर्यंत पसरला आहे. हा भारत, चीन, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तानपर्यंत पसरला आहे.

हिमालयातील सर्वोच्च शिखराचे नाव माऊंट एव्हरेस्ट आहे. हे शिखर चीन आणि नेपाळच्या दरम्यान स्थित आहे.

क्षेत्रफळाच्या हिशेबाने पाहिले तर हिमालयाचा सर्वात मोठा हिस्सा चीन ( तिबेट क्षेत्र ) मध्ये मोडतो.

 लांबीच्या मानाने भले चीनमध्ये याचा मोठा भाग येत असला तरी सर्वात उंच शिखरे आणि दाटीचा भाग भारत आणि नेपाळच्या दरम्यान आहे.

हिमालयाचा सर्वात छोटा भाग भूतान आणि पाकिस्तानच्या हिश्श्यात येतो.या प्रकारे हिमालयाच्या रांगा 5 देशात पसरलेल्या आहेत.

नेपाळ येथे हिमालयाच्या रांगात ट्रेकिंग केले जाते. येथील उंच शिखरे ट्रेकींगसाठी लोकप्रिय आहेत.