22 August 2025
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
नाचणीत अनेक न्युट्रीशियन असतात.यात कॅल्शियम,प्रोटीन, आयर्न, फायबर, मिनिरल्स आणि अनेक प्रकारचे विटामिन्स आढळतात
नाचणीची भाकरीत फायबर असल्याने वेट लॉससाठी चांगली आहे. ब्लड शुगर लेव्हलपासून हार्ट हेल्थ आणि पचन यंत्रणेसाठी ही उत्तम असत
ज्वारी देखील पोषक तत्वांनी भरपूर असते.विटामिन्स बी,मॅग्नेशियम,पोटॅशियम,आयर्न,मिनरल्स,प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत आहे.यात एंटीऑक्सिडेंट देखील असते.
ज्वारी आरोग्यासाठी चांगली असते. याने पचन चांगले होते. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये रहाते.हृदयासाठी देखील चांगली असते.याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो.
जयपुरच्या क्लिनिकल न्युट्रीशनिस्ट मेधावी गौतम यांच्या मते ज्वारी आणि नाचणी दोन्ही भाकरी आरोग्यासाठी चांगल्या आहेत.दोन्हींची पोषक तत्व जवळपास सारखीच असतात.
आहारतज्ज्ञ मेधावी गौतम यांच्या मते नाचणीत कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण ज्वारी पेक्षा थोडे जास्त असते.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नाचणी चांगला पर्याय आहे.
ज्वारी आणि नाचणीची भाकरी बनवणे थोडे जाडसर पिठ असल्याने त्यांना गरम पाण्यात मळून त्याची भाकरी हाताने थापावी लागते. चपाती पेक्षा हे थोडे अवघड काम असते.