आर्थरायटीस ओळखण्याच्या  टेस्ट कोणत्या ?

12 october 2025

Created By: Atul Kamble

आर्थरायटीस म्हणजे सांध्यांना सूज येते. वाढत्या वयाने, जखम झाल्याने, लठ्ठपणाने किंवा जेनेटिक कारण वा इम्युन सिस्टीमच्या गडबडीने हा आजार होतो. काही वेळा व्हायरल बॅक्टेरियल इंफेक्शनही हा आजार होतो.

सातत्याने सांध्यात दुखणे,सूज, लालसरपणा याची लक्षणे आहेत.सकाळी उठल्यानंतर सांधे अखडणे. किंवा हलका ताप येणे ही आर्थरायटीसची लक्षणे आहेत

 डॉ.मोना गोयल यांच्या मते आर्थरायटीसच्या निदानासाठी अनेक प्रकारच्या रक्तचाचण्या आहेत. या टेस्ट शरीरातील सूज,इम्यून सिस्टीमची एक्टीव्हीटी आणि इन्फेक्शनची पातळी दाखवतात.

 रुमेटॉईड फॅक्टर टेस्ट या नावाची एण्टी बॉडी आहे की नाही ते दाखवते.ही टेस्ट पॉझिटीव्ह आली तर रुमेटॉईड आर्थरायटीसची शक्यता असते.

ही टेस्ट त्या एंटीबॉडीजना ओळखते, ज्या शरीराच्या स्वत:च्या पेशींवर हल्ला करतात.ही टेस्ट आर्थरायटीसच्या सुरुवातीच्या पायरीसाठी अचूक मानली जाते.

ESR ( Erythrocyte Sedimentation Rate ) ही टेस्ट सूजेचे प्रमाण मोजते.ESR पातळी जर जास्त असेल तर शरीरात    कोणते तरी इंफ्लेमेशन वा इंफेक्शन चालू आहे.

 CRP( C-Reactive Protein Test) ही टेस्ट सूजेचा शोध घेते.CRP ची पातळी वाढला तर डॉक्टर आर्थरायटीस वा अन्य इंफ्लेमेटरी आजाराचे निदान करतात