मखाने खाल्ल्याने शरीराला कोणते व्हिटामिन्स मिळतात ?

Created By: Atul Kamble

26 March 2026

मखाने हा हेल्दी स्नॅक आहे. यात कमी कॅलरी आणि जास्त पोषक तत्वे असतील. शरीराला एनर्जी देण्यासह अनेक पोषक तत्वेही मखान्याने मिळतात.

मखान्यात व्हिटामिन्स B1 आढळते. जे मेंदू आणि नर्व्हस सिस्टीमला योग्य कार्य करण्यास मदत करते.

व्हिटामिन्स B2 शरीराच्या पेशींचे आरोग्य चांगले राखते. त्वचा चमकदार बनवते आणि हे डोळ्यांच्या आरोग्यास लाभदायक असते.

 मखान्यातील व्हिटामिन्स B3 मेटाबॉलिझ्मला चांगले बनवते.रक्तप्रवाह सुधारणे आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास सहायक ठरते.

मखान्यातील व्हिटामिन B6 मेटाबॉलिझ्म आणि ब्रेन हेल्थसाठी चांगले असते. मखाने खाल्ल्याने मूड चांगला होतो. आणि थकवाही कमी जाणवतो.

 मखान्यात व्हिटामिन्स सी देखील असते. जे इम्युनिटी मजबूत करते शरीराला संक्रमणापासून वाचवते.स्कीन हेल्थ देखील सुधारते.

व्हिटामिन्स K हाडांना मजबूत करणे आणि ब्लड क्लॉटिंगसाठी गरजेचे असते. मखाने हाडांची कमजोरी दूर करते.