जगातला पहिला इमोजी कोणी बनवला, World Emoji Dayला जाणा ?
17 July 2025
Created By: Atul Kamble
१७ जुलैला जगभरात इमोजी डे साजरा केला जातो.इमोजी डिजिटल जगातला अविभाज्य भाग बनला आहे.पण पहिला इमोजी कोणी बनवला
चॅट मॅसेजमध्ये आपण मजा म्हणून आपण इमोजी कॅरेक्टर शेअर करतो,त्यात हसणे,रडणे,प्रेम अशा भावना व्यक्त करतो
जगातला पहिला इमोजी जपानच्या शिगेतका कुरीता यांनी तयार केला,ते मोबाईल ऑपरेटींग कंपनीत एक इंजिनिअर होते.त्यांनी इमोजीचा एक संच तयार केला
१९९९ मध्ये शिगेतका कुरीचा यांनी इमोजी पहिल्यांदा डिझाईन केला.त्यावेळी त्यांनी १७६ इमोजीचा संच तयार केला.मोबाईल युजरना आपल्या भावना शेअर करण्यासाठी हे काम केले
इमोजीचा वापर १९९९ मध्ये जपानमध्ये सुरु झाला.मोबाईल कंपन्यांनी मॅसेजिंगमध्ये समावेश केला.हळूहळू जगभरात सोशल मीडिया,चॅट,मॅसेजमध्ये ते वापरले गेले
जेरेमी बर्ज यांनी साल २०१४ मध्ये 'वर्ल्ड इमोजी डे'ची सुरुवात केली.त्यांनी Appleच्या Mac iCal या App च्या लाँचसाठी १७ जुलै ही तारीख निवडली होती.तिच इमोजी डेची तारीख ठरली
इमोजी आता डिजिटलचा अविभाज्य भाग आहेत.चॅटिंग पासून सोशल मीडियापर्यंत इमोजीचा खूप वापर होतो.आपल्या भावना शब्दापेक्षात इमोजीने जास्त व्यक्त होतात