वीजेवर धावणाऱ्या मेल-एक्सप्रेसलाही जनरेटर का लावलेले असते ?
Created By: Atul Kamble
9 feb 2026
भारतीय रेल्वेच्या बहुतांशी ट्रेन ओव्हरहेड वायरच्या वीजेवरच धावतात.परंतू या इलेक्ट्रीक ट्रेनलाही जनरेटर ( पॉवर कार ) लावलेले असते.यामागे कारण काय ?
इलेक्ट्रीक लोकोमोटीव्ह हे ओव्हरहेड वायरमधून 25,000 volt एसी वीज घेतात.मात्र ही वीज ट्रेनच्या सर्व भागापर्यंत जात नाही.
ट्रेनमध्ये 3 प्रकारची वीज लागते. पहिली ट्रॅक्शन मोटर चालवण्यासाठी-25kV, दुसरी कोचच्या लाईट्स,पंखे, एसीसाठी 110V/220V DC आणि तिसरी चार्जिंग आणि इमर्जन्सी सिस्टीमसाठी
25kV चे हाय व्होल्ट ट्रॅक्शनसाठी असते.कोचला एवढी जास्त वीज नाही देऊ शकत.यासाठी ट्रेनमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि कन्व्हर्टर लावलेले असते.
प्रत्येक ट्रेनच्या शेवटी पॉवर कार (EOG) वा जनरेटर कार असते.ती डिझेल जनरेटर सेट चालवून 750/110V वीज बनवते.जी कोचचे लाईट्स, फॅन,AC आणि चार्जिंगसाठी वापरली जाते.
ओव्हरहेड वायरमध्ये फॉल्ट आला, वा जेथे इलेक्ट्रीक ट्रॅक नाही तेव्हा जनरेटर कार चालवून जनरेटर कार चालवून ट्रेनच्या कोचला वीज मिळते.
आधी जनरेटर कामध्ये 2-3 डिझेट जनरेटर सेट लावलेले असायचे.आता HOG ( Head On Generation)सिस्टीम आहे.ज्यात लोकोमधूनच कोचला वीज पुरविली जाते.मात्र,बॅकअपसाठी जनरेटर ठेवले जाते.
जनरेटर कार इमर्जन्सी लाईट्स, पंखे आणि चार्जिंग पॉईंट्सला वीज देतात.ओव्हरहेड फेल झाल्यावर प्रवाशांना अंधारात रहावे लागत नाही.
आता नव्या LHB कोचच्या ट्रेनमध्ये HOD सिस्टीम असते. लोकोमोटिव्हने कोचला वीज मिळते. तरीही सेफ्टीसाठी बॅकअप जनरेटर वा बॅटरी सिस्टीम ठेवली जाते.
जनरेटर कार वा बॅकअप सिस्टीम छोटे वाटत असली तर ट्रेनच्या कोचची वीजेची उपकरणे चालवतो.