हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती फळे खावीत ?

Created By: Atul Kamble

8 feb 2026

फळात फायबर,एंटीऑक्सीडेंट आणि आवश्यक पोषक तत्वे असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो, ब्लडप्रेशर नियंत्रणात येते. हृदयाच्या नसा मजबूत होतात. चला तर पाहूयात कोणती फळे हृदयासाठी चांगली

 सफरचंदात फायबर असते. जे बॅड कोलेस्ट्रॉल कम करण्यास मदत करते. रोज एक सफरचंद खाल्याने हृदयाचे आरोग्य चांगले रहाते.

 केळात पॉटेशियम भरपूर असते. ज्यामुळे ब्लडरप्रेशर नियंत्रणात रहाते. त्यामुळे हृदयावर कमी दबाव येतो.

संत्र्यात सी व्हिटामिन आणि एंटीऑक्सीडेंट तत्वे जास्त असतात. नसांचे आरोग्य चांगले रहाते आणि सूज कमी करते.

डाळिंबातील  एंटीऑक्सीडेंट तत्वे हार्टच्या धमन्यात रक्ताचा फ्लो योग्य ठेवतात.त्यामुळे हृदय मजबूत होते.

पपईत फायबर आणि एंजाईम असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित रहाते.त्यामुळे हृदयाचे आजार कमी होतात.

द्राक्षातील पॉलीफेनॉल्स हृदयासाठी फायद्याचे असते. ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास आणि हृदयाला आरोग्यादायी राखण्यास मदत करते.