थंडीत शुगर लेव्हल का वाढते ? कसे कराल कंट्रोल ?

Created By: Atul Kamble

28 December 2025

थंडीत शारीरिक एक्टीव्हीटी कमी असते आणि हाय कॅलरी जेवण वाढते. त्यामुळे इन्सुलिनवर परिणाम होऊन शुगर वाढते.

शुगर वाढल्याने तहान लागते, वारंवार लघवीला होते. लक्ष न दिल्यास हार्ट, किडनी आणि डोळ्यांचे नुकसान होते.

डॉ.एल.एच. घोटेकर यांच्यामते थंडीत गोड, तळलेले खाऊ नये,हिरव्या भाज्या, डाळी, फायबर युक्त आहार घ्यावा,ज्यामुळे शुगर जास्त वाढणार नाही.

रोज हलका व्यायाम करा, चालण्यास जा,योग आणि स्ट्रेचिंग केल्याने इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य करते.

 डायबिटीजच्या गोळ्या वेळेत खा, वेळोवेळी शुगर तपासा, मोसम बदलताना दुर्लक्ष केल्यास शुगर अचानक वाढू शकते. 

थंडीत कमी तहान लागते. त्यामुळे डीहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे कोमठ पाणी प्या, याने मेटाबॉलिझ्म चांगले होते. शुगर नियंत्रणात रहाते.

 तणाव कमी करावा, झोप पूर्ण घ्या त्यामुळे ताण-तणावातून शुगर वाढणार नाही.