भूक लागल्यानंतर पोटातून आवाज का येतो?

28 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

भूक लागल्यानंतर तेव्हा काही खायला मिळाले नाही तर पोटात गडगडायला लागतं. 

वैज्ञानिक भाषेत, भुकेमुळे एखाद्या व्यक्तीच्या पोटातून येणाऱ्या आवाजाला बोरबोरिग्मी म्हणतात. 

भूक लागते तेव्हा मेंदू पचनसंस्थेला अन्नाची गरज असल्याचे संकेत देते. याचा थेट परिणाम पोट आणि आतड्यांवरील स्नायूंवर होतो. 

स्नायू आकुंचन पावतात आणि आराम करतात तेव्हा वायू आणि पाचक रस आतड्यांमध्ये क्रिया करतो. यामुळे गुड गुड असा आवाज येतो.

पोट रिकामी झाल्यानंतर गॅस आणि पाचन रस तयार होतो. पण अन्न नसल्याने आवाज दाबू शकत नाही. त्यामुळे आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. 

जेव्हा भूक लागते तेव्हा पचनसंस्था सक्रिय होते. अन्नाची अपेक्षा असताना गॅस आणि पाचक रस हलतो. त्यातून ध्वनी निर्माण होतो. 

भूक लागली हे मेंदूला कोण सांगते? तर याचं उत्तर आहे हार्मोन्स.. भूक लागते तेव्हा हार्मोन्स बाहेर पडतात. ते मेंदुला भूक लागल्याचं सांगतात. 

चेहऱ्याला थेट लिंबू लावायचा की नाही? जाणून घ्या