चेहऱ्याला थेट लिंबू लावायचा की नाही? जाणून घ्या
28 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
लिंबूत अनेक पोषक तत्व आहेत. यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, तसेच व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी चांगलं असतं.
लिंबू त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. यामुळे त्वचा तजेलदार होते. तसेच कोलेजन वाढतं. पण ते थेट चेहऱ्याला लावल्याने नुकसान होऊ शकतं.
लिंबू कायम दुसऱ्या पदार्थांमध्ये मिक्स करून लावावं. अन्यथा चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. काय ते जाणून घ्या.
लिंबू थेट चेहऱ्याला लावल्यास जळजळ आणि पुरळ उठू शकतात. कारण त्यात सायट्रिक आम्ल असतं.
लिंबू थेट लावल्याने त्याची रिएक्शन होऊ शकते. उन्हात निघाल्यानंतर त्याचा परिणाम दिसू शकतो. काळे डाग, फोड येऊ शकतात.
लिंबू त्वचेतील नैसर्गिक तेल शोषून घेते त्यामुळे त्वचा कोरडी आणि ताणलेली वाटू शकते. सतत वापरल्याने त्वचेचा वरचा थर सोलू शकतो.
लिंबाचा पीएच जवळपास 2 असतो. तर त्वचेचा पीएच जवळपास 5.5 असतो. त्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडू शकतो. मुरूम किंवा त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते.
भूक लागल्यानंतर पोटातून आवाज का येतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा