29 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
दुबईत एकही सोन्याची खाण नाही. तरीही भारताच्या तुलनेत दुबईत सोनं स्वस्त मिळतं. कारण...
बहुतांश लोकं दुबईला जातात आणि तेथून सोन्याची ज्वेलरी खरेदी करून भारतात आणतात.
भारताच्या तुलनेत खरंच दुबईत सोनं स्वस्त मिळतं. यासाठीच भारतीय लोकं दुबईतून सोनं खरेदी करतात.
दुबईत सोनं स्वस्त कारण म्हणजे तिथे कोणताही टॅक्स नाही. दुबईत सोन्यावर जीएसटी लागत नाही. फक्त 5 टक्के व्हॅट लागतो.
दुबईत तुम्ही व्हॅटवर पूर्ण रिफंड क्लेम करू शकता. फक्त यासाठी निश्चित वेळ मर्यादा लक्षात ठेवावी लागेल.
जगभरातील खाणीतून सोनं दुबईला आणलं जातं आणि शुद्ध केलं जातं. त्यानंतर भारत आणि चीनला विकलं जातं. हे जगातील सर्वात मोठे ग्राहक आहेत.
दुबईतून सोन आणण्यापूर्वी तुम्हाला भारतातील काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.