भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोटींच्या घरात आहे.
9 March 2025
रेल्वेने प्रवास करणारे लोकांना रेल्वे संदर्भातील वेगवेगळी माहिती जाणून घेण्याची इच्छा असते.
रेल्वे स्टेशनवरुन रेल्वे जाताना शेवटच्या डब्यावर पिवळ्या रंगात X लिहिले असते, ते का लिहिलेले असते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
रेल्वे प्रशासनच्या या सिब्बॉलमध्ये मोठा अर्थ दिला गेला आहे. त्यात रेल्वेच्या सुरक्षेची खात्री आहे.
शेवटच्या डब्यावर पिवळ्या रंगात X लिहिलेला कोच आला म्हणजे रेल्वेचे सर्व कोच रवाना झाले आहेत, त्याचे ते संकेत आहे.
X लिहिलेला कोच गेला म्हणजे त्या रेल्वेचा त्या स्टेशनावरुन प्रवास पूर्णपणे सुरक्षित झाला आहे.
X लिहिलेला कोच नसेल तर कुठे दुर्घटना झाल्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे स्टेशन मास्टर सतर्क होवून त्याची माहिती पुढील स्टेशनवर देतात.
रेल्वेच्या प्रत्येक सिम्बॉलमध्ये विशिष्ट अर्थ असतो. त्याची माहिती प्रवाशांना नसली तरी रेल्वे कर्मचाऱ्यांना करुन दिलेली असते.
हे ही वाचा... होळीला भगवतांना कोणता रंग लावावा? जाणून घ्या रंगांची माहिती