याबा टॅबलेटची थायलंडपासून भारतापर्यंत चर्चा, नेमकं असं काय आहे?

15 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

आसामध्ये 2.5 कोटी रुपयांच्या 50 हजार याबा गोळ्या जप्त केल्या आहेत. ही खेप मणिपूरमार्गे गुवाहाटीला आली होती.

हे एक अंमली पदार्थ आहे. म्यानमार, थायलंड आणि बांग्लादेश आशियाई देशात याचा वापर होतो. भारतातही याचे प्रमाण वाढले आहे.

हे मेथाम्फेटामाइन आणि कॅफिन या दोन रसायनांपासून तयार केलं जातं. दोन्ही रसायनांमुळे ते घातक होतं.

मेथाम्फेटामाइन हे उत्तेजक औषध आणि कॅफिन नशेची तीव्रता वाढवते. दोन्ही एकत्र आल्याने त्याची तीव्रता अधिक होते.

याबा या लहान गुलाबी किंवा लाल रंगाच्या गोळ्यांच्या स्वरुपात असतात. कधी कधी या गोळ्यांवर WY ही इंग्रजी अक्षरं असतात.

ही गोळी चावून किंवा गिळली जाते. यामुळे उर्जेची पातळी वाढते. हृदयाचे ठोकेही वाढतात.

हे औषध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत भारतात बेकायदेशीर आहे. पकडले गेले तर 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

कावीळ का होते? सुरुवातीची लक्षणं काय असतात? ते जाणून घ्या