1 April 2024

प्राचीन काळापासून वापरले जाणारे जगातील सर्वात दहा जुने राष्ट्रीय झेंडे 

Mahesh Pawar

जगातील प्रत्येक राष्ट्राने स्वतःचा राष्ट्रध्वज आहे. मात्र, यातील काही देशांचे राष्ट्रध्वज हे प्राचीन काळापासून वापरले जात आहेत.

जपानचा राष्ट्रध्वज याला 'हिनोमारू' म्हणतात. हा ध्वज सन 701 मध्ये तयार केला. 27 फेब्रुवारी 1870 रोजी लाल वर्तुळ असलेला पांढरा ध्वज देशाने स्वीकारला.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेल्या डेन्मार्कच्या ध्वजाला 'डॅन्नेब्रोग' म्हणतात. सन 1219 मध्ये लिंडेनिझच्या लढाईनंतर त्याची रचना करण्यात आली.

ऑस्ट्रियाचा ध्वज Osterreich म्हणून ओळखला जातो. 1230 मध्ये त्याचे डिझाइन केले गेले. हा युरोपमधील सर्वात जुना ध्वज आहे.

लॅटेवियाच्या ध्वजाला 'लॅटविजास करोग्ज' म्हणतात. सेसिसच्या लाटवियन जमातींनी पांढऱ्या पट्ट्यासह लाल ध्वज तयार केला होता.

रशियन साम्राज्यापासून स्वतंत्र झाल्यानंतर 1921 मध्ये हा ध्वज अधिकृतपणे स्वीकारण्यात आला.

स्वित्झर्लंडचा ध्वज स्विस परंपरांशी संबंधित आहे. त्याला 'सेंट जॉर्ज ध्वज' म्हणतात. स्वित्झर्लंडचा वर्तमान ध्वज अधिकृतपणे 1841 मध्ये स्वीकारण्यात आला.

अल्बेनियाच्या ध्वजाला 'फ्लामुरी कोम्बेतार' म्हणतात जो 1912 मध्ये देशाला मिळाला. 1946 मध्ये कम्युनिस्ट हुकूमशाहीने गरुडावर लाल तारा जोडला.

स्वीडिश ध्वज 16 व्या शतकात स्वीकारण्यात आला. 19 एप्रिल 1562 रोजी अधिकृत ध्वज बनला.

1581 मध्ये स्पेनपासून डच देशाला स्वातंत्र्य मिळाले. डच ध्वज हा 'प्रिन्सेनव्हलॅग' पासून मिळाला.

रशियाचा ध्वज प्रथम 1696 मध्ये वापरला गेला. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर हा ध्वज पुन्हा राष्ट्रध्वज बनवण्यात आला.